E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
वॉशिंग्टनमध्ये गोळीबार!
Samruddhi Dhayagude
22 May 2025
इस्रायली दूतावासातील दोन कर्मचारी ठार; संशयिताला घेतलं ताब्यात
वॉशिंग्टन डीसी येथील ज्यू संग्रहालयाजवळ बुधवारी संध्याकाळी झालेल्या गोळीबारात इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही माहिती होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी दिली आहे. मेट्रोपोलिटन पोलीस विभागाने सांगितले की, या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेत एक पुरूष आणि एक महिला ठार झाली आहे.
ट्रम्प यांच्याकडून निषेध
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल वर पोस्ट केली आहे. “डीसी येथील हे भयानक हत्याकांड निश्चितपणे याहूदी-विरोधी भावनांवर आधारित आहे, या आत्ताच थांबल्या पाहिजेत! अमेरिकेत द्वेष आणि कट्टरतावादाला स्थान नाही. पीडितांच्या कुटुंबियांबद्दल सद्भावना,” असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी देखील वॉशिंग्टन येथे झालेल्या दोन इस्त्रायली कर्मचाऱ्यांच्या हत्येवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हा गोळीबार धक्कादायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच जगभरातील सर्व इस्रायली दूतावासांमध्ये सुरक्षा वाढवली जाईल, असेही म्हटले. याहूदी विरोधी भावनेची आणि इस्त्रायलविरोधातील टोकाची चिथावणी याची भयानक किंमत आपण मोजत आहोत. इस्त्रायलविरोधातील ब्लड लिबेल्सची (Blood Libels) किंमत रक्ताने मोजावी लागत आहे आणि याचा शेवटपर्यंत सामना केला पाहिजे, असे नेतान्याहू म्हणाले आहेत.
सेक्रटरी नोएम यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, वॉशिंग्टन डीसी येथील ज्यू संग्रहालयाजवळ आज रात्री दोन इस्त्रायली दूतावासातील कर्मचाऱ्यांची निर्घृणपणे हत्या झाली. आम्ही याची कसून चौकशी करत आहोत आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी कार्यरत आहोत. कृपया पीडितांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करा. आम्ही या प्रकरणातील गुन्हेगारांना त्यांच्या योग्य शिक्षेपर्यंत नेऊ.
Related
Articles
उंड्रीत नागरिकांच्या घरात शिरले पाणी
28 May 2025
निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी
03 Jun 2025
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : डुडी
28 May 2025
चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
28 May 2025
कास-पठारावरील फुलोत्सव ऑगस्टनंतरच
02 Jun 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
उंड्रीत नागरिकांच्या घरात शिरले पाणी
28 May 2025
निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी
03 Jun 2025
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : डुडी
28 May 2025
चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
28 May 2025
कास-पठारावरील फुलोत्सव ऑगस्टनंतरच
02 Jun 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
उंड्रीत नागरिकांच्या घरात शिरले पाणी
28 May 2025
निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी
03 Jun 2025
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : डुडी
28 May 2025
चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
28 May 2025
कास-पठारावरील फुलोत्सव ऑगस्टनंतरच
02 Jun 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
उंड्रीत नागरिकांच्या घरात शिरले पाणी
28 May 2025
निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी
03 Jun 2025
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : डुडी
28 May 2025
चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
28 May 2025
कास-पठारावरील फुलोत्सव ऑगस्टनंतरच
02 Jun 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात